Wednesday, August 20, 2025 09:36:16 AM

लीलावती रुग्णालयात 1500 कोटींचा घोटाळा उघड

लीलावती रुग्णालयात 1500 कोटींचा घोटाळा; विश्वस्त किशोर मेहतांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप

लीलावती रुग्णालयात 1500 कोटींचा घोटाळा उघड

अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीसाठी लीलावती प्रशासनाची मागणी
मुंबई: लीलावती रुग्णालयात तब्बल 1500 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून, हा गैरव्यवहार दिवंगत विश्वस्त किशोर मेहतांच्या काही नातेवाईकांनी केल्याचा आरोप आहे. रुग्णालय प्रशासनाने अंमलबजावणी संचालनालय (ED) कडे तक्रार दाखल केली आहे.

रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "लीलावती रुग्णालयाची स्थापना आमच्या दिवंगत विश्वस्त किशोर मेहता आणि त्यांच्या पत्नी चारू मेहता यांनी 1997 मध्ये केली होती. मात्र, 2002 मध्ये किशोर मेहता आजारी असताना, त्यांच्या भाऊ आणि पुतण्यांनी रुग्णालयाचा बेकायदेशीर ताबा घेतला आणि तब्बल 20 वर्षे त्याचे नियंत्रण स्वतःकडे ठेवले."

बनावट कागदपत्रांद्वारे मोठ्या प्रमाणात निधी हडप
या कालावधीत रुग्णालयात बनावट खरेदी, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. प्रशासनाच्या मते, बोगस कंत्राटे आणि खोट्या शुल्कांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्कम हडप केली गेली.

उन्हाच्या झळा वाढल्या; माठांची मागणी वाढली, बाजारपेठेत गरिबांचा फ्रीज दाखल

याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात आधीच 12 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तसेच, न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी (JMFC) न्यायालय क्रमांक 12 च्या आदेशानुसार अजून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आर्थिक गैरव्यवहाराबाबत ईडीकडे तक्रार
रुग्णालय प्रशासनाने अंमलबजावणी संचालनालयाकडे पत्र पाठवून मनी लाँड्रिंगच्या चौकशीची मागणी केली आहे. सिंग यांच्या मते, "या काळात हडप केलेला निधी कदाचित देशाबाहेर पाठवण्यात आला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गंभीर आर्थिक गुन्हा असून, आम्ही याबाबत अधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे."

या प्रकरणाचा तपास आता अंमलबजावणी संचालनालय आणि पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या गैरव्यवहाराबाबत अधिक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.


 


सम्बन्धित सामग्री