बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेसाठी निवड सुरू आहे. मुंबईच्या कांदिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल तरणतलावात बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सराव केला आहे. बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या स्पर्धेचे 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलं आहे. बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी हाच या मागचा उद्देश्य आहे. ही संस्था स्पेशल ऑलिम्पिक इंटरनॅशनलची मान्यताप्राप्त शाखा आहे आणि 2001 मध्ये तिची स्थापना झाली. 4 आणि 5 ऑगस्टला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रीय बाल पुरस्कार सन्मानित स्वयम पाटील यांच्या हस्ते होणार आहे.