Wednesday, August 20, 2025 09:22:49 AM

अनिल अंबानी ईडीसमोर उपस्थित राहणार ?

अनिल अंबानी ईडीसमोर उपस्थित राहणार

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाकडून अनिल अंबानी यांना समन्स बजावण्यात आला आहे. 3000 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. काही कंपन्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेच्या अनेक आरोपांसह, बँक कर्ज फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा एक भाग म्हणून 24 जुलै रोजी छापे टाकण्यात आले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार दिल्ली आणि मुंबईत किमान तीन दिवस छापे टाकण्यात आले. हे परिसर 50 कंपन्या आणि 25 लोकांचे आहेत, ज्यात अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांचे अनेक अधिकारी समाविष्ट आहेत. 25 हून अधिक व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री