करिश्मा कपूरच्या अफेअर्सची आजही चर्चा
करिश्माने 90 च्या दशकात बॉलीवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
करिश्माच्या अनेक चित्रपटांची आजही चर्चा आहे.
वयाच्या सतराव्या वर्षी 1991 मध्ये ''प्रेम कैदी'' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
हम साथ साथ है, राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, कुली नं.1, हिरो नं. 1 या गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
करिश्माच्या अभिनयासोबतच तिच्या अफेअर्सचीही चर्चा होती.
करिश्माचे अजय देवगण, सलमान खान आणि अभिषेक बच्चन या अभिनेत्यांशी प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या.