कोरफड त्वचेसाठी फायदेशीर
कोरफडीचा उपयोग आयुर्वेद, सौंदर्य उपचार, आणि घरगुती औषधांमध्ये केला जातो.
नैसर्गिक मॉइश्चरायझर असल्यामुळे कोरफडीचा जेल कोरड्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
उन्हामुळे जळालेल्या त्वचेवर कोरफडीचा लेप लावल्याने थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते.
त्वचेच्या कोणत्याही प्रकारच्या एलर्जी किंवा पुरळांवर कोरफड गुणकारी आहे.