Wednesday, August 20, 2025 04:36:27 AM

'या' गोष्टी चुकूनही मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नका; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. परंतु, याचा वापर करताना खूप सावधगिरी बाळगावी लागते. मात्र अनेकांना मायक्रोवेव्हचा वापर कशा पद्धतीने करावा याची माहिती नसते. त्यामुळे बऱ्याचदा मायक्रोवेव्हमध्ये आग लागण्याची किंवा स्फोट होण्याची भीती असते.

'या' गोष्टी चुकूनही मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नका; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

परंतु, याचा वापर करताना खूप सावधगिरी बाळगावी लागते. मात्र अनेकांना मायक्रोवेव्हचा वापर कशा पद्धतीने करावा याची माहिती नसते. त्यामुळे बऱ्याचदा मायक्रोवेव्हमध्ये आग लागण्याची किंवा स्फोट होण्याची भीती असते.

चला तर जाणून घेऊया, असे कोणते ३ वस्तू आहेत, जे चुकूनही मायक्रोवेव्हमध्ये ठेऊ नये.

1 - ॲल्युमिनियम फॉइल: मायक्रोवेव्हमध्ये फॉइल पेपर (aluminum foil) ठेवणे किंवा वापरणे खूप धोकादायक असू शकते. याचे कारण म्हणजे फॉइल पेपरमुळे आग किंवा स्फोट होऊ शकतो. इतकंच नाही, तर त्याच्या वापरामुळे मायक्रोवेव्ह खराब होऊ शकतो.

मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये धातूचा पृष्ठभाग असतो आणि फॉइल पेपर देखील धातूचा बनलेला असतो, ज्यामुळे मायक्रोवेव्हच्या लाटा धातूसोबत आदळू शकतात आणि ठिणग्या तयार करू शकतात. त्याऐवजी काच किंवा सिरॅमिक वापरावे.

2 - अंडी: मायक्रोवेव्हमध्ये अंडी कधीही ठेवू नका. कारण असे केल्याने अंडी फुटू शकतात आणि त्यामुळे मायक्रोवेव्ह खराब होऊ शकतो किंवा स्फोट होऊ शकतो.

3 - डिस्पोजेबल बॉक्स (Disposable box): डिस्पोजेबल बॉक्स विवाहसोहळा आणि पार्ट्यांमध्ये अन्न, पेय देण्यासाठी वापरले जातात. परंतु, या वस्तूंना मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी ठेवणे खूप धोकादायक असू शकते.

याचे कारण म्हणजे हे डिस्पोजेबल बॉक्स जास्त तापमानामध्ये वितळू शकतात आणि त्यातील धोकादायक केमिकल्स तुमच्या जेवणामध्ये मिसळू शकतात. त्यामुळे या वस्तूंना मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही ठेऊ नये.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)



सम्बन्धित सामग्री