उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय? 'हे' आहेत कोकणातील प्रसिद्ध नयनरम्य ठिकाण
कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील निसर्गरम्य आणि सुंदर ठिकाण आहे.
समुद्रकिनारे, धबधबे, डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलांनी नटलेला कोकण साहस, रोमांच आणि शांतता या तिन्ही गोष्टींसाठी उत्तम आहे.
चला सविस्तर जाणून घेऊया.
1 - हरिहरेश्वर (रायगड): हरिहरेश्वर ठिकाण तिथे असलेल्या परशुराम मंदिर, शांत समुद्रकिनारा आणि ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे ठिकाण हरिहरेश्वर, हर्षिनाचल आणि पुष्पाद्री या तीन टेकड्यांनी वेढलेले आहे.
2 - गणपतीपुळे: हे मंदिर 400 वर्षे जुने मंदिर आहे. या मंदिराला स्वयंभू गणपती मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर 1600 वर्षांपूर्वी सापडले होते.
3 - तारकर्ली: तारकर्ली समुद्रकिनारा त्याच्या निर्मळ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा समुद्रकिनारा मालवणपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे.
4 - सिंधुदुर्ग किल्ला: सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी परदेशी व्यापारी आणि सिद्धींच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी बांधला होता.
5 - दापोली: दापोली हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे. ब्रिटिशांनी येथे आपले तळ ठोकले होते म्हणून या शहराला कॅम्प दापोली असेही म्हणतात.
6 - आरे वारे: गणपतीपुळे सागरी मार्गावर आरे वारे हा समुद्रकिनारा आहे. आरे आणि वारे हे दोन समुद्रकिनारे एकाच डोंगराच्या दोन बाजूला आहेत.
7 - देवघाली समुद्रकिनारा: देवघाली समुद्रकिनारा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी गावात आहे. देवघाली समुद्रकिनारा टेकड्या आणि समुद्राच्या अनोख्या संगमासाठी प्रसिद्ध आहे.