रेशीम शेतीची आस धरा, लक्ष्मी येईल तुमच्या घरा…
तुती रेशीम उद्योग हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये चालू आहे.
टसर रेशीम उद्योग प्रामुख्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने चालू असून यातून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना उत्तम जोडधंदा लाभला आहे.
नैसर्गिक रेशीम धाग्याला त्याच्या मुलायमप्रमाणे ‘वस्त्रोद्योगाची राणी’ असे संबोधण्यात येते.
रेशीम कोष उत्पादन झाल्यानंतर त्यापासून रेशीम धागा निर्मिती करुन वस्त्र निर्मिती केली जाते.
शासनामार्फत या योजनेचा विस्तार व विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत.
शेतीसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन त्यांचे आर्थिक उत्पन्नात भर पडावी हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.