Kolhapur Ganpati Temples : 'हे' आहेत कोल्हापुरातील प्रसिद्ध गणपती मंदिर; जाणून घ्या
कोल्हापूर: कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर, रंकाळा तलाव, कोल्हापुरी चप्पल, शालिनी पॅलेस, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, आदी.
पण तुम्हाला माहित आहे का? कोल्हापुरात अशी अनेक गणपतीचे मंदिरे आहेत, जी आजूनही प्रसिद्धीपासून दूर आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया, कोल्हापुरातील प्रसिद्ध गणपती मंदिरे कोणती आहेत.
बिनखांबी गणेश मंदिर - कोल्हापूर: या मंदिराची बांधणी करताना एक ही खांबाचा वापर केला नाही. त्यामुळे, या मंदिराला बिनखांबी गणेश मंदिर म्हणले जाते. हे मंदिर कोल्हापुरातील सर्वांत प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे.
ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर - कोल्हापूर: ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे कोल्हापुरातील प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर शिवाजी उद्यम नगरजवळ असलेल्या जयंती ओढ्याजवळ आहे. सिद्धिविनायक देवस्तान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. मान्यतेनुसार, कोल्हापुरात येणारे भाविक या मंदिरातील गणपतीचे दर्शन घेतात आणि मगच पुढे जातात.
पितळी गणपती - कोल्हापूर: पितळी गणपती कोल्हापुरातील वरधा कॉलनी परिसरात आहे. हे मंदिर त्याच्या सुंदर पितळी गणेश मूर्ती शांत आणि सुंदर वातावरणासाठी ओळखले जाते. यासह, हे मंदिर कोल्हापुरातील प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे.
चंबुखडी गणेश मंदिर - कोल्हापूर: हे मंदिर चंबुखडी परिसराच्या डोंगरावर आहे. यासह, हे मंदिर रंकाळा तलावापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे आणि अंबाबाई मंदिरापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)