Wednesday, August 20, 2025 10:11:29 AM

राजकीय नाराजीनाट्य ! बीडीडी चाळ कार्यक्रमात आदित्य ठाकरे अनुपस्थित, चर्चांना उधाण

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांसाठी बांधलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील पहिल्या टप्प्यातील नागरिकांना चावी देण्याचा कार्यक्रम होणार आहे.

राजकीय नाराजीनाट्य  बीडीडी चाळ कार्यक्रमात आदित्य ठाकरे अनुपस्थित चर्चांना उधाण

मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांसाठी बांधलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील पहिल्या टप्प्यातील नागरिकांना चावी देण्याचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. या दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत आदित्य ठाकरे यांना भाषणाची संधी न दिल्याने ते नाराज आहेत, अशी माहिती समोर आली आहे.


सम्बन्धित सामग्री