लातूर: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर कोकाटेंना प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. छावा संघटना देखील कोकाटेंविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी शब्द पाळावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा छावा संघटनेने सरकारला दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी छावा संघटनेकडून करण्यात येत आहे.
राज्यभरात दौरे करुन अजित पवारांविरोधात शेतकऱ्यांची मोट बांधणार असा इशारा छावा संघटनेने दिला आहे. अजित पवारांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्यांनी दिलेला शब्द पाळावा असं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी म्हटलं आहे. माणिकराव कोकाटेंविरुद्ध छावा संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: Navi Mumbai Crime: अश्लील संभाषण, अर्धनग्न व्हिडीओ सेंड; दहावीच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे चाळे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारपर्यंत कोकाटेंचा राजीनामा होईल, मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ असा शब्द दिला होता. मात्र दादांचा शब्द खोटा ठरला असल्याचे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी म्हटले आहे. माणिकराव कोकाटेंविरोधात कोणताही निर्णय घेतला गेला नाही. दादा शब्दाचा पक्का आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे दादांचा वादा खोटा ठरला असेही त्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे शेतकऱ्यांच्या प्रश्वासाठी राज्यव्यापी दौर करणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार असल्याचा शब्द छावा संघटनेचे विजय घाडगे यांना पुणे येथे झालेल्या भेटीत दिला होता. परंतु कोकाटेंना सरकारने अभय दिल्याने छावा संघटना बुधवारपासून रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा विजय घाडगे यांनी दिला आहे.
अजित दादांनी शब्द न पाळल्याने छावा संघटना आक्रमक झाली आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने छावा संघटना राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्यव्यापी दौरा करणार आहे. यावेळी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न छावा संघटना करणार आहे.