Wednesday, August 20, 2025 10:40:44 AM

अमरावतीत बच्चू कडू उतरले रस्त्यावर; प्रहार संघटनेकडून भररस्त्यात चक्काजाम आंदोलन

अमरावतीत बच्चू कडू उतरले रस्त्यावर प्रहार संघटनेकडून भररस्त्यात चक्काजाम आंदोलन

 

प्रहार संघटनेने आज राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागपूर आणि अमरावती महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. अमरावतीत बच्चू कडू स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी मागणी प्रहारच्या बच्चू कडू यांनी केली आहे. पुण्यात प्रहार संघटनेकडून भररस्त्यात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले आहे. तसेच फर्ग्युसन महाविद्यालय परिसरात प्रहारने रस्ता रोखला आहे. शेतकरी सरकार विरोधात आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून सरकारविरोध घोषणा देण्यात येत आहेत. 

 


सम्बन्धित सामग्री