भंडारा: भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. आता पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री झाले आहेत. संजय सावकारे यांच्या जागी पंकज भोयर हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असणार आहेत. पालकमंत्रीपदाच्या पदामुळे भंडाऱ्यात नवीन बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
नवीन जबाबदारी दिल्याबद्दल फडणवीसांचे आभार
गेल्या आठ महिन्यातील काम बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. निश्चितपणे, फडणवीसांनी विश्वास दाखवला. त्यामुळे वर्धा जिल्ह्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही करु असे पंकज भोयर यांनी म्हटले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेल्या योजनांची अंमलबजावणी सर्वसामान्यपर्यंत करण्याचा प्रयत्न करु. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही. ऑनलाईन अर्ज करुनही त्यांना योजनेपासून वंचित रहावे लागले. याबद्दल बोलताना,धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा निर्णय घेऊ असे नवनिर्वाचित पालकमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा: Manoj Jarange VS Nitesh Rane: फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द वापरले तर जीभ हासडून देऊ; नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
भंडाऱ्याचे पालकमंत्रीपदी पंकज भोयर यांची वर्णी लागली आहे. याआधी संजय सावकारे भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून काम करत होते. त्यांच्यावर आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संजय सावकारे यांना डिमोशन का करण्यात आले? याबद्दलचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.