नवी दिल्ली: नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अनेकांना धक्का बसला. परंतु राजधानी दिल्लीत भाजपाचे कमल फुलल्यानंतर सर्वत्र आनंद व्यक्त केला जातोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी देखील x प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून भाजपाचे अभिनंदन केलंय. यह मोदीजी की गॅरंटी का कमाल असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेनी भाजपाला शुभेच्छा दिल्यात.
हेही वाचा:एकनाथ शिंदेंकडून भाजपाचं अभिनंदन
याच पार्शवभूमीवर दिल्लीत मोदींच्या हजेरीत रात्री भाजपचं सेलिब्रेशन होणारे. रात्री 8 वाजता मोदी भाजप मुख्यालयात जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हजेरीत हे सेलिब्रेशन होणारे. दिल्लीत भाजपची विजयाच्या दिशेनं घोडदौड असून रात्री 8 मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचं सांगण्यात आलंय. दिल्लीतील विजयाचं भाजपाकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात येत असून भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होताच ठाण्यात जल्लोष साजरा करण्यात आलाय. ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजप कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला असून कार्यकर्त्यानमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो घेऊन जल्लोष साजरा करण्यात आलाय.