मुंबई: शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसैनिकांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
'भाजपने पाळलेली बेडकं डराव डराव करतात'
उद्धव ठाकरे भाषणातून म्हणाले, पक्ष, चिन्ह, बाप चोरला, तरी शिवसेना, उद्धव ठाकरे संपणार नाही. पैसो फेको तमाशा देखो, असा शिंदेंचा मेळावा असल्याची टीका त्यांनी केली. राजकारणात पोरं न होणारे आमच्या घराणेशाहीवर टीका करत आहेत. भाजपने पाळलेली बेडकं डराव डराव करतात. जनतेला दिलेला वादा भाजपनं पाळला नाही, मग मला दिलेला शब्द भाजप कसा पाळेल? असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा: पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
'मालकांचे नोकर गाठीभेटी घेतात'
मोदी सरकार देशासाठी पनौती आहेत. शाह देशाचे गृहमंत्री की गुंडाचे गृहमंत्री? भाजपचं हिंदुत्व नेमकं काय? असे सवालही ठाकरे यांनी केले. भाजपनं फक्त दाऊदला पक्षात घ्यायचं राहिलंय. गुजरातमध्ये हिंदी सक्ती करुन दाखवा असेही उद्धव यांनी म्हटले. जनतेच्या, राज्याच्या मनात जे तेच होणार आहे. मालकांचे नोकर गाठीभेटी घेतात असे उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत भाष्य केले आहे.
मुंबई जिंकायचीच, तुम्ही तयार आहात का ? अ से आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.