Sunday, August 31, 2025 09:58:00 PM

महायुती सरकारमध्ये भाजपाच्या ‘या’ आमदारांना मिळणार संधी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे.

महायुती सरकारमध्ये भाजपाच्या ‘या’ आमदारांना मिळणार संधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. नागपुर येथे आज अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी ४ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपद मिळण्यासाठी अनेक नेते मंडळींचा प्रयत्न सुरू होता. काहीही झालं तरी मलाच मंत्रिपद मिळणार, असा दावा अनेक नेते करत होते. दरम्यान फडणवीस यांनी अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद देण्याचे ठरवले असल्याची माहिती आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेक नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला. 

नागपुरात आज मंत्र्यांचा शपथविधी समारोह पार पडणार आहे. या सोहळ्याला भाजपाच्या १९ आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपाच्या बऱ्याच नवीन चेहऱ्यांना फडणवीस सरकारमध्ये संधी देण्यात येणार आहे. 

फडणवीस सरकारमध्ये भाजपाच्या 'या' चेहऱ्यांना संधी?  


चंद्रशेखर बावनकुळे
नितेश राणे 
शिवेंद्रराजे भोसले 
चंद्रकांत पाटील 
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा 
गिरीश महाजन 
जयकुमार रावल 
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
माधुरी मिसाळ
अतुल सावे
आकाश फुंडकर
अशोक उईके
जयकुमार मोरे
संजय सावकारे
आशिष शेलार


सम्बन्धित सामग्री