मुंबई: मागील 7 वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला की, नवीन प्रभार रचनेनुसारच निवडणुका होतील. यासह, ओबीसी आरक्षणानुसार निवडणूका होणार आहे. यावर, महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मला खूप आनंद आहे. यासह, मागासवर्गीय बांधव-भगिनी आहेत, त्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे'.
हेही वाचा: ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार;सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय
मंत्री छगन भुजबळ म्हणाले
'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मला खूप आनंद आहे. यासह, मागासवर्गीय बांधव-भगिनी आहेत, त्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु, एक आहे, की अनेकांना ही गोष्ट माहीत नाही, की हे का असं? आपल्याला तर आरक्षण मिळालं आहे, मग काय गडबड झाली? तर गडबड अशी झाली आहे की, 2017 मध्ये कोणीतरी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. तुम्हाला कल्पना आहे की, मेडीकल डॅटा नाही, त्यांचं आरक्षण रद्द करा, अशी केस मांडण्यात आली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 2019 मध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु डॅटा मिळाला नाही. डॅटा चुकीचा आहे, त्यात काही त्रुटी आहेत, असे सांगण्यात आले', अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली.