Wednesday, August 20, 2025 09:32:42 AM

संजय राऊतांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारसदारावरुन जुंपल्याच पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते.

संजय राऊतांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

महाराष्ट्र: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारसदारावरुन जुंपल्याच पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात हजेरी लावली. संघाच्या मुख्यालयाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले असल्याने याची सर्वत्र चर्चा होतेय . पंतप्रधान मोदींचा वारसदार ठरवला गेल्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तसा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसदार हा महाराष्ट्रातील असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

हेही वाचा: अनुष्का शर्मा सोबत लग्न करण्यापूर्वी विराट कोहलीवर फिदा होत्या 'या' तरुणी

काय म्हणाले संजय राऊत? 
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची एक भूमिका आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसतेय. ज्या अर्थी मोदींना 10-11 वर्षानंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही. भाजप अध्यक्ष नड्डा यांनी संघाची गरज नाही अशी भाषा केली होती. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती पंतप्रधान मोदींचीच भूमिका असते. हे जेव्हा तुम्ही समजून घेता, तेव्हा मोदींना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे, असं राऊत म्हणाले. आपल्या सहकाऱ्यांसाठी, भाजपसाठी धोरण केलं आहे, की 75 व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल. आता मोदींजींनाही केदारनाथच्या गुंफेत जावं लागेल, असेही राऊत यांनी म्हटले.

संजय राऊतांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचं उत्तर:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचा दावा फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारसदारावरुन जुंपल्याच पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात हजेरी लावली. संघाच्या मुख्यालयाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले असल्याने याची सर्वत्र चर्चा होतेय . 


 


सम्बन्धित सामग्री