सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेत राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले. लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकण्यात आले. यानंतर पत्ते फेकणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. सूरज चव्हाण यांनी विजयकुमार घाडगेंना बेदम मारहाण केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सुनील तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकले गेले. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली आहे.