Wednesday, August 20, 2025 09:16:11 AM

वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

'मराठी माणूस कोणामुळे मुंबईबाहेर फेकला गेला?', असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. 'वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही', असं वक्तव्य करत शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

विनायक पवार. प्रतिनिधी. पालघर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात, रविवारी दुपारी 2 वजल्याच्या सुमारास मनोर येथील सायलेंट रिसॉर्टमध्ये शिवसेना पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. या दरम्यान, एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला. 'मराठी माणूस कोणामुळे मुंबईबाहेर फेकला गेला?', असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. 'वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही', असं वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला. 

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पहिला मदतीचा हात शिवसेनेचा असतो. हिंदुस्तानमध्ये हिंदू ही बाळासाहेबांची व्यापक भूमिका आहे. तुम्ही प्रत्येकजण ढाण्या वाघ आहात. यासह, विरोधकांना चारही बाजूंनी लोळवण्याची ताकद तुमच्या मनगटात आहे. त्यामुळे, वाघाचं कातडं पांघरलेले लांडगे कधी वाघ होऊ शकत नाही'. 


सम्बन्धित सामग्री