मुंबई: विधानसभेत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. 'डिनो मोरियाचं तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल', असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले आहे. भष्ट्राचाराच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तसेच, आजचा दिवस वादळी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: सरकारची फसवणूक; जलसंधारणात 272 कोटींचा घोटाळा उघडकीस
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
'मिठी'मध्ये मिठीचा गाळ. मिठी नदीतला गाळ कोण काढत आहे? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? मराठी माणूस नाही दिसला, तर डिनो मोरिया दिसला. आता त्या मोरियाने जर तोंड उघडलं तर किती जणांचा मोरया होईल', असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केले.