Monday, September 01, 2025 12:54:54 AM

देवाभाऊच महाराष्ट्राचा लाडका भाऊ

देवाभाऊच महाराष्ट्राच्या लाडक्या बहीणींचे लाडके भाऊ ठरले आहेत.

देवाभाऊच महाराष्ट्राचा लाडका भाऊ

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. भाजपाच्या विधिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. लाडक्या बहीणींनी भरभरून मते दिल्यानंतर देवाभाऊच महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींचे लाडके भाऊ ठरले आहेत.

विधिमंडळाच्या बैठकीत भाजपाच्या सर्व 132 आमदारांनी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. ऐवढ्या संघर्षानंतर अखेर देवेंद्र फडणवीस 15 व्या विधानसभेचे मुख्यमंत्री होणार आहेत. याआधी 2014 साली त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील होते.

देवाभाऊ शब्दाचे पक्के

देवेंद्र फडणवीसांनी अनेक सभांमधून मी पुन्हा येईन असे उद्गार काढले होते. तसे त्यांनी पुन्हा येऊन दाखवले. फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप काम केले आहे. महाराष्ट्रासाठी कल्याणकारी योजना आणल्या आहेत. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊन देवाभाऊ महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात पोहोचले आहेत.

 

देवाभाऊंनी आणली लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र राज्यासाठी कल्याणकारी योजना आणून देवाभाऊंनी महाराष्ट्रात स्वत:ची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील महिलांना दरमहा 1500 रूपये देण्यास सुरूवात केली आहे. लाडक्या बहीणींना दरमहा 1 हजार 500 रूपये देऊन त्यांनी राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यास सुरूवात केली आहे. देवाभाऊंचा हा निर्णय लाडक्या बहीणींनी मनावर घेऊन देवाभाऊंना विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. यापुढेही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या लाडक्या बहीणींसाठी अनेक योजना आणून त्यांना अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न करतील.          

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री