Wednesday, August 20, 2025 09:33:06 AM

'...तर सरकारी बंगला सोडेन'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीमामा द्यावा लागला. मात्र, मंत्रीपद जाऊन 6 महिने झाले तरीही सरकारी बंगला न सोडल्याने धनंजय मुंडे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

तर सरकारी बंगला सोडेन धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

मुंबई: संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीमामा द्यावा लागला. मात्र, मंत्रीपद जाऊन 6 महिने झाले तरीही सरकारी बंगला न सोडल्याने धनंजय मुंडे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एकीकडे, मंत्रीपद मिळूनही छगन भुजबळांना अद्याप सरकारी बंगला मिळाला नाही. तर दुसरीकडे, करुणा शर्मा माजी मंत्री धनंजय मुंडेंना आपल्या घरी राहायला येण्यासाठी सांगत आहे. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री धनजंय मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं कारण सांगितलं. 

धनंजय मुंडे काय म्हणाले?

'मुंबईतील सातपुडा हा सरकारी निवासस्थान मी अजूनही सोडले नाही अशा विविध बातम्या येत आहेत. तसेच, मुंबईतील माझी घरे राहण्यायोग्य नसल्याने तिथे दुरूस्तीचे काम सुरू आहे. माझ्या लहान मुलीची शाळासुद्धा याच भागात असल्याने आणि माझ्या आजारांवर उपचार करण्यासाठी मला मुंबईत राहणे महत्त्वाचे आहे. मात्र, या परिसरात तात्काळ भाड्याने घर मिळणे अवघड आहे, त्यासाठी माझा शोधही सुरू आहे. माझ्या घराचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान सोडणार असून, शासनाकडे मी विनंतीही केली आहे', अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली.

करूणा शर्मांची धनंजय मुंडेंना ऑफर

धनंजय मुंडेंचे मत्रिपद जाऊन 6 महिने उलटले. मात्र तरीही त्यांनी सरकारी बंगला न सोडल्याने करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंना खडेबोल सुनावले. याबाबत, जेव्हा करूणा शर्मांना प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्या म्हणाल्या, 'तुम्ही बंगला सोडा आणि माझ्या फ्लॅटमध्ये राहायला या', अशी ऑफर करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंना दिली. 

पुढे, करुणा शर्मा म्हणाल्या की, 'धनंजय मुंडे यांचे मुंबईतील मलबार हिल्स, पवई आणि सांताक्रूझ येथील फ्लॅट अशी तीन घरे आहेत. त्यांचे दोन फ्लॅट भाड्याने जरी दिले असले तरी ते त्यांच्या पत्नीसोबत सांताक्रूझ येथील घरात येऊन राहू शकतात. आपण हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊ'. 


सम्बन्धित सामग्री