भाजपा आमदार सुरेश धस माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंडेंच्या कार्यकाळात खत घोटाळा झाल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने वाल्मिक कराडवर आरोप होत होते. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून कराडची ओळख आहे. खंडणी प्रकरणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराडवर गुन्हे दाखल आहेत. कराडचे निकटवर्तीय असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली. यानंतर धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. आता मुंडेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा येण्याच्या चर्चांवरुन धस यांनी आरोप केला आहे. एमएआयडीसी दाखवून त्यांच्याकडूनच खते विकत घेतली असे करुन खताचं लिकिंग करण्याचं काम मधल्या काळामध्ये झालं असल्याचं धस यांनी म्हटलं आहे.