Sunday, August 31, 2025 02:34:44 PM

आयकर विभागाच्या नोटीसवरुन शिरसाटांचं घुमजाव; श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाकडून नोटीस आल्याची कबुली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

आयकर विभागाच्या नोटीसवरुन शिरसाटांचं घुमजाव श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाकडून नोटीस आल्याची कबुली

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. त्यानंतर चर्चांणा उधाण आले आणि यानंतर पुन्हा एकदा संजय शिरसाटांनी आपले वक्तव्य मागे घेतलं. आपल्या तोंडी वाक्य घातलं गेल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. परंतु हे अधिवेशन सोडनू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्लीला गेले. शिंदे अचानक दिल्ली गेल्याची माहिती कोणलाचा माहिती नव्हती. त्यांनी दिल्लीवारी गुप्त होती. अशातच श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाने नोटीस दिल्याची माहिती संजय शिरसाटांनी दिली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले आणि शिरसाटांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं. तसेच त्यांचे वक्तव्य मागे घेतलं. 

हेही वाचा: गद्दार कुणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो; परबांच्या आरोपावर काय म्हणाले शंभूराज देसाई?

आयकर विभागाच्या नोटीसवरुन शिरसाटांचं घुमजाव
संजय शिरसाट म्हणाले, "मी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही तफावत वाटत असल्याने मला नोटीस आली आहे. त्या नोटीसला मी उत्तर देणार आहे. पण याच वेळी काही पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की श्रीकांत शिंदे यांनादेखील नोटीस आली आहे का? तर श्रीकांत शिंदे यांना कोणती  नोटीस आली आहे का? याबाबत मला कोणतीही माहिती नाही".

संजय शिरसाट यांनी श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. या वक्तव्याने राजकीय गदारोळ निर्माण झाला. यानंतर शिरसाटांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले आणि माझ्या तोंडी हे वक्तव्य घातल्याचे म्हटले आहे. शिरसाटांच्या या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले आहे. तसेच बुधवारी एकनाथ शिंदे गुपचुप दिल्लीला गेले होते. दिल्लीला जाऊन त्यांनी बड्या नेत्यांच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्याची चर्चा आहे. परंतु शिंदेंची ही दिल्लीवारी कोणत्या कारणासाठी होती, हे कळालेले नाही? मात्र शिरसाटांनी केलेल्या वक्तव्याने श्रीकांत शिंदेंना आलेल्या नोटीसमुळे एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. 

'माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही'
संजय शिरसाट म्हणाले "राजकीय पुढाऱ्यांना नोटीस येतं नाही असं वाटतं असतं. मात्र नोटीसा येतात, मला नोटीस आली आहे आणि आम्ही त्याचे योग्य ते उत्तर देणार आहे. त्यांना आमच्याकडून स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. तसेच सरकार सरकारचे काम करत आहे. यंत्रणा यंत्रणांचे काम करत आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही."


सम्बन्धित सामग्री