Sunday, August 31, 2025 05:00:55 PM

तानाजी सावंत यांच्या अडचणीत वाढ?

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घोटाळ्याचा आरोप होत आहे.

तानाजी सावंत यांच्या अडचणीत वाढ

 मुंबई : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घोटाळ्याचा आरोप होत आहे. यांत्रिकी साफसफाईच्या कामासाठी कोट्यावधीचा घोटळा केल्याचे समोर आले आहे. राज्यातील सर्व रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील साफसफाईची काम याआधी 70 कोटींमध्ये व्हायची. त्यासाठी सावंतांनी त्यांच्या मर्जीतल्या कंपनीला 3 हजार 190 कोटीं दिले. यामुळे तानाजी सावंतांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत अशी जोरदार टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. 
 
'त्यामुळे मुलगा 68 लाख हवेत उडवतो'
हे सर्वसामान्यांचे सरकार आहे असा शिंदे फडणवीसांकडून सांगितलं जातं. परंतु तानाजी सावंत यांचा नवा घोटाळा बाहेर येतो आहे. 70 कोटी रुपयांच्या कामासाठी तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळेच तर तानाजी सावंत यांचा मुलगा 68 लाख रुपये असेच हवेत उडवतो. 

हेही वाचा : MVA Meeting: महाविकास आघाडीच्या बैठकांचा सिलसिला

तानाजी सावंत यांनी काढलेले टेंडर रद्द

आरोग्य आणि शिक्षण विभागात समन्वय नव्हता असं नाही. मी आणि भुसे साहेब आम्ही समनव्याने काम करत असल्याचे आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे. तानाजी सावंत यांनी काढलेले टेंडर रद्द करण्यात आले. एखाद्या कामात अनियमता असल्यास त्यात तपासणी करणे क्रमप्राप्त आहे. योग्य पद्धतीने काम करायला हवं, त्यात काही गैर नाही. यात बेबनाव असल्याचा विषय नाही, कोणता पक्ष वगैरे हा विषय नाही असे आबिटकर यांनी म्हटले आहे. 

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने तीन वर्षांसाठी 'मेकॅनाइझ्ड क्लीनिंग सर्व्हिसेस'साठी पुण्यातील बीएसए कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार करण्यात आला होता. या कराराला त्यावेळी विरोध झाला होता. ठेकेदाराला हजारो कोटी रुपयांचा फायदा करून देणारा हा करार आहे, अशी टीका झाली होती. विशेष म्हणजे हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला नव्हता. मात्र मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचे भासवून कार्यारंभ आदेश काढण्यात आला होता. करार झाला त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मेकॅनाइझ्ड क्लीनिंग सर्व्हिसेस कंपनीसोबत करार करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे फडणवीसांच्या लक्षात आले. या करारामुळे ठेकेदारांना अधिक रक्कम दिली जाणार होती. त्यामुळे फडणवीसांनी निवदेची अंमलबजावणी थांबवण्याचे आदेश दिले. 


सम्बन्धित सामग्री