Wednesday, August 20, 2025 09:15:35 PM

राज्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नेते

सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

राज्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नेते

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नागपूर येथे पार पडला. महायुती सरकारमध्ये 33 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तर 6 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, योगेश कदम या आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

पुण्यातील पर्वती मतदारसंघातून आमदार म्हणून माधुरी मिसाळ या निवडून आल्या आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आमदार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेलं महिला व्यक्तीमत्वं आहे. पुण्यातील पर्वती या भागातून 10 वर्षे नगरसेविका म्हणून काम पाहिलेले आहे.  भाजपच्या विधानसभा प्रतोदपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.  2019 मध्ये भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर होती. सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

मेघना बोर्डीकर या जिंतूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. 2019 सालीही त्यांनी आमदार म्हणून काम पाहिलेले आहे. खेड-दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागलीत्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच वेळेस खेड-दापोली मतदार संघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. पंकज भोयर यांनी ही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते वर्धा मतदारसंघातून भाजपाकडून निवडून आले आहेत. इंद्रनील नाईक हे पुसद विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि आता त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

राज्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नेते

१ माधुरी मिसाळ

२ आशिष जयस्वाल

३ पंकज भोयर

४ मेघना बोर्डीकर

५ इंद्रनील नाईक

६ योगेश कदम

 


सम्बन्धित सामग्री