मुंबई : राज्यात नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता जिल्ह्यांचे कोणाला पालकमंत्रीपद कोणाला मिळते. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पालकमंत्री पदाबाबत एकत्रित निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बीडमध्ये मुंडे घराण्यातील भाऊ आणि बहीण मंत्री झाले आहेत. भाजपाकडून पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बीज जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांची चर्चा करणार आहे. त्यानंतर बीडच्या पालकमंत्री पदाबाबत एकत्रित निर्णय घेऊ अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार? याची उत्सुकता बीडच्या नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.
हेही वाचा : ठाण्यात 93 हेक्टर कांदळवन नष्ट
‘बीडमध्ये दादागिरी चालू देणार नाही‘
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण पेटले आहे. देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे. देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने हिवाळी अधिवेशनात मुंडे यांच्यावर विरोधकांनी टीका केली. देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील वातावरण चांगलेच तापले आहे. बीडमध्ये दादागिरी चालू देणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.