Wednesday, August 20, 2025 09:26:47 AM

40 समर्थकांची नावं बनावट? शिवसेनेत प्रवेशावरून मोठा गौप्यस्फोट

अकोलेतील नेते मारुती मेंगाळ यांच्या शिवसेना प्रवेशावेळी सादर केलेल्या यादीतील अनेक नावे बनावट असल्याचा आरोप, त्यामुळे पक्षातच गोंधळ निर्माण, वरिष्ठ नेत्यांकडून निर्णयाची प्रतीक्षा

40 समर्थकांची नावं बनावट शिवसेनेत प्रवेशावरून मोठा गौप्यस्फोट

अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील अकोले तालुक्यात राजकीय वादंगाला तोंड फुटले असून, ठाकर समाजाचे स्थानिक नेते मारुती मेंगाळ सध्या चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशावेळी त्यांच्यासोबत अकोले तालुक्यातील अनेक सरपंच, नगरसेवक, पंचायत सदस्य आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र अलीकडेच समोर आलेल्या माहितीमुळे या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यादीत नाव असलेल्या अनेकांनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे की, त्यांनी असा कोणताही पक्षप्रवेश केलेला नाही, आणि त्यांची नावे चुकीने यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

ही बाब पुढे येताच शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी खुलासा करत सांगितले की, पक्षाच्या वतीने स्थानिक स्तरावर कोणतीही पूर्वसूचना न देता हा पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला. त्यांनी यावर नाराजी व्यक्त करत यादीतील जवळपास 40-50 नावे बोगस असल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आली असून वरिष्ठ नेत्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, 9 ऑगस्ट रोजी 'आदिवासी दिना'च्या निमित्ताने मेंगाळ यांनी अकोले येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. 

 


सम्बन्धित सामग्री