Thursday, August 21, 2025 12:38:05 AM

मुंडे भाऊ-बहिणीने घेतली शपथ

मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी घेतलेली मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे.

मुंडे भाऊ-बहिणीने घेतली शपथ

मुंबई : राजकीय वितुष्टततेमुळे कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख असलेल्या या मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी घेतलेली मंत्रि‍पदाची शपथ राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. विधानपरिषदेवर आमदार झालेल्या पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये संधी मिळणार की नाही? अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने त्यांना संधी दिली. तसेच राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांनीही संधी दिल्यामुळे आता भाऊ-बहिण एकत्रपणे मंत्रिमंडळात काम करताना दिसणार आहेत.

 

भावा बहिणीमध्ये काय होता वाद?

 

दिवगंत गोपीनाथ मुंडे यांच्याशी राजकीय मतभेदानंतर धनंजय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

आरोप-प्रत्यारोपानंतर मुंडे भाऊ-बहिणींत टोकाचे वितुष्ट

धनंजय यांनी  2014 साली परळीतून पंकजांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली

त्या निवडणुकीत पंकजा यांचा 40 हजारांहून अधिक मतांनी पराभव

या राजकीय संघर्षामुळे भावा-बहिणीच्या नात्यातील दरीही वाढली

2023 मध्ये राजकीय समीकरणे बदलली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी

भाजपकडून पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाची संधी


सम्बन्धित सामग्री