Thursday, September 04, 2025 01:32:50 AM

नागपूरातील संविधान चौकात मविआचं आंदोलन

नागपूरमध्ये संविधान चौकात महाविकास आघाडीने आंदोलनाला सुरूवात केली आहे.

नागपूरातील संविधान चौकात मविआचं आंदोलन

नागपूर : नागपूरमध्ये संविधान चौकात महाविकास आघाडीने आंदोलन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांनी आंदोलन करण्यात सुरूवात केली आहे. मविआने संविधान चौकात आंदोलन केले आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले आहे.

हेही वाचा: 'भाजपकडून महापुरुषांचा होणारा अपमान संतापजनक'

 

हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. या चौथ्या दिवस अधिवेशाच्या कामकाजापूर्वी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले आहे. सभागृहाचे कामकाज होण्यापूर्वी सकाळी संविधान चौक येथे काँग्रेस आमदारांनी डॉ. बाबासाहेबर आंबेडकरांचे फोटो असणारी पाटी हातात घेत घोषणा दिल्या आणि शाह यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तसेच माफी मागण्याची मागणी केली. यानंतर सर्व सदस्य सभागृहाच्या दिशेने घोषणा देत निघाले. आंबेडकर, आंबेडकर...! बाबासाहेब का अपमान नही सहेगा हिंदुस्तान! अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदारांनी दिल्या आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

3t

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री