Wednesday, August 20, 2025 09:31:13 AM

कोंडीचा जाब विचारताच ऑफ ड्युटी पोलिसाला मारहाण; मनसेच्या निलेश बाणखेलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल

वाहतूक कोंडीचा जाब विचारल्याने ऑफ ड्युटी पोलिसाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी नवी मुंबई मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोंडीचा जाब विचारताच ऑफ ड्युटी पोलिसाला मारहाण मनसेच्या निलेश बाणखेलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई: वाहतूक कोंडीचा जाब विचारल्याने ऑफ ड्युटी पोलिसाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ही घटना नवी मुंबईतील ऐरोली याठिकाणी घडली. या प्रकरणी नवी मुंबई मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी मारहाण प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. 

रविवारी रात्री 11 च्या सुमारास निलेश बाणखेले यांच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरु होता. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलीस कर्मचारी सागर भोसले हॉटेलमधून गाडीवरुन जात होते. दरम्यान बाणखेलेंचे समर्थक भोसले यांच्या गाडीसमोर आले आणि त्यांच्या शाब्दिक चकमक झाली. पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी निलेश बाणखेले यांच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर बाणखेलेंच्या 10 ते 15 समर्थकांनी भोसलेंना मारहाण केली. 

हेही वाचा: PM Kisan 20th Installment: पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

वाहतूक कोंडीचा जाब विचारल्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण 
वाहतूक कोंडीचा जाब विचारला म्हणून सागर भोसले यांना बाणखेलेच्या समर्थकांनी मारहाण केली. यानंतर दुसऱ्या दिवशी बाणखेले यांनी पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनंतर उपशहर प्रमुख निलेश बाणखेले यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर बाणखेले यांनीही पोलीस कर्मचारी सागर भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. 

बाणखेलेंचीही भोसलेंविरोधात पोलिसात तक्रार 
नवी मुंबईत भररस्त्यावर रात्री 11 वाजताच्या सुमारास बर्थडे पार्टी सुरु होती. यामुळे पूर्ण रस्ता अडला होता. याच वाहूतक कोंडीचा जाब ऑफ ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने विचारला. त्यावर त्याला बाणखेले यांच्या सर्मथकांकडून जबर मारहाण झाली. मारहाणीनंतर सोमवारी भोसले यांनी बाणखेलेंसह त्याच्या 15 समर्थकांवर गुन्हा दाखल केला. सागर भोसलेंच्या तक्रारीनंतर मंगळवारी निलेश बाणखेले यांनीही रबाळे पोलीस ठाण्यात भोसलेंविरोधात गुन्हा नोंदवला आहे. रविवारी कोणतीही दुखापत झाली नसताना सोमवारी भोसले यांनी तक्रार दाखल केली. यानंतर घडलेल्या घटनेविरोधात बाणखेलेनीही गुन्हा दाखल केला. 

 


सम्बन्धित सामग्री