मुंबई: एकीकडे संसदेत पावसाळी अधिनेशन सुरू असताना दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात सोमवारी भेट घेतली. विशेष बाब म्हणजे, काही तासांपूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही राष्ट्रपती भवनात दाखल झाले. त्यामुळे, देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
हेही वाचा: ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार;सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय
भेटीमागील कारण काय?
या भेटींबद्दल राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे, हा प्रश्न उद्भवला आहे की, ही बैठक केवळ औपचारिक होती की कोणत्याही विशिष्ट निर्णयाशी संबंधित होती, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, मोदी आणि शहा यांनी राष्ट्रपतींना स्वतंत्रपणे भेटणे ही एक दुर्मिळ घटना आहे. अशा भेटी सहसा औपचारिक असतात किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतात.
राजकीय विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, ही बैठक संसदेत काही महत्त्वाची विधेयके सादर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर झाली असावी. विशेषतः, समान नागरी संहिता (UCC) च्या अंमलबजावणीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. राम मंदिर आणि कलम 370 नंतर, भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावरील यूसीसी हे उर्वरित प्रमुख धोरण मानले जाते. ते उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आले आहे आणि गुजरात आणि आसामनेही राज्य पातळीवर ते लागू करण्याचा त्यांचा हेतू दर्शविला आहे.