नवी दिल्ली: सोमवारपासून संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध विषयांवर भाष्य केले. संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान मोदी म्हणाले की, 'हे पावसाळी अधिवेशन देशासाठी खूप अभिमानास्पद असेल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर इतिहासात प्रथमच भारतीय तिरंगा फडकवणे हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद असणार आहे'. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत म्हणाले की, 'जगाने आपली ताकद पाहिली'.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'पावसाळी अधिवेशनात सर्वांचे स्वागत आहे. पावसाळी अधिवेशन हे नवीनतेचे प्रतीक आहे. माहितीनुसार, देशातील हवामान खूप चांगली प्रगती करत आहे. तसेच, शेतीसाठी हा हवामान खूप फायदेशीर आहे. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेत, देशाच्या अर्थव्यवस्थेत, ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत पाऊस अतिशय महत्त्वाचा आहे. माहितीनुसार, गेल्या दहा तुलनेत यावेळी पाण्याचे साठे 3 पटीने वाढले आहेत. ज्यामुळे आगामी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल'.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या दशकांत शांतता आणि प्रगती दिसून आली. यासह, रेड कॉरिडॉर आता हरित विकास क्षेत्रात रूपांतरित होत आहे. 2014 पूर्वी महागाईचा दर दुहेरी अंकात होता. आता तो जवळपास दोन टक्क्यांच्या आसपास आहे. सध्या महागाई कमी आहे आणि विकास दर जास्त आहे'. या दरम्यान, मोदींनी सशस्त्र दलांचे कौतुक केले. यासह, त्यांनी खासदार आणि विविध पक्षांना एकतेचा संदेश देण्याचे आवाहन केले.
हेही वाचा: Mumbai Train Blast Verdict: मुंबई लोकल साखळी बॉम्ब स्फोटप्रकरणी 12 आरोपी निर्दोष
अधिवेशनाहबाबत मोदी म्हणाले...
'हे अधिवेशन देशासाठी अभिमानास्पद आहे आणि स्वतःच विजयोत्सव आहे. जेव्हा आपण असे म्हणते की हे अधिवेशन राष्ट्रीय अभिमानाचे आणि विजयोत्सवाचे सत्र आहे, तेव्हा सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रथमच भारतीय तिरंगा ध्वज फडकवणे हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे. हा एक यशस्वी प्रवास आहे, ज्याने देशाला विज्ञान आणि नवीनतेकडे नेले आहे. सर्वजण या अभिमानाच्या क्षणाच्या अनुभव घेत आहे. सर्वांकडून कोतुक केले जात आहे', असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा: Sanjay Raut: महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होणार; संजय राऊतांचा दावा
'जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली' - मोदी
या दरम्यान पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. यावर, मोदी म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त करण्यात आले. इतकच नाही, तर संपूर्ण जगाने मेक इन इंडियाची शक्ती पाहिली. तसेच, मेड इन इंडिया लष्करी शक्तीच्या या नवीन स्वरूपाकडे जग खूप आकर्षित झाले. जेव्हा जेव्हा मी परदेशात माझ्या सहकाऱ्यांना भेटतो, तेव्हा ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले जाते'.