Wednesday, August 20, 2025 02:18:52 PM

खडसेंचा जावई अडचणीत; मोबाईलमध्ये 1497 मुलींचे आक्षेपार्ह फोटो, एकनाथ खडसे म्हणाले...

काही दिवसांपूर्वी, रेव्ह पार्टी करताना पुणे पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडले. या प्रकरणानंतर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

खडसेंचा जावई अडचणीत मोबाईलमध्ये 1497 मुलींचे आक्षेपार्ह फोटो एकनाथ खडसे म्हणाले

मुंबई: काही दिवसांपूर्वी, रेव्ह पार्टी करताना पुणे पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडले. या प्रकरणानंतर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. प्रांजल खेवलकर यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. विशेष बाब म्हणजे, राज्य महिला आयोगाने असा आरोप केला की, या पार्टीत मानवी तस्करी झाली आहे. अशातच, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी आरोप केला की, 'प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. या फोटोचा वापर करून त्यांनी अनेक मुलींना ब्लॅकमेल केले.  त्यानंतर, एकनाथ खडसे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 'काही पुरावे असतील तर सर्वात मोठी बाब आहे. एखाद्यावर पुराव्यांशिवाय आरोप करणं चुकीचं आहे', अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. 

हेही वाचा: 'उद्धव ठाकरेंनी चष्म्याचा नंबर बदलावा'; बावनकुळे आक्रमक

काय म्हणाले एकनाथ खडसे?

'काही पुरावे असतील तर सर्वात मोठी बाब आहे. एखाद्यावर पुराव्यांशिवाय आरोप करणं चुकीचं आहे. रुपाली चाकणकर यांनी ते फोटो पाहिलेत का? याबद्दल मला माहिती नाही. या संदर्भात पोलिसांनी आम्हाला काही सांगितले नाही. जर असे काही फोटो किंवा व्हिडीओ मिळाले असतील तर मी  त्याचे समर्थन करणार नाही. जे सत्य आहे ते बाहेर येईल. या प्रकरणात जो चुकीचा असेल त्याला शिक्षा मिळेल. मग ती शिक्षा फाशीची असू दे किंवा कोणतीही असू दे, आम्ही समर्थन करणार नाही. आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही. माझा जावई असू दे नाहीतर कोणी, मी चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही. त्यासंदर्भात तक्रार आली तर मी लगेच सांगेल की, याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करा. मात्र, बदनामीसाठी खोटे आरोप करू नका. जे सत्य आहे ते मांडा', असे वक्तव्य एकनाथ खडसेंनी केले.

हेही वाचा: मृणालला धनुषच्या बहिणींचीही साथ? अखेर अफेअरच्या चर्चेमध्ये झाला मोठा खुलासा

रुपाली चाकरणकरांचा आरोप

'प्रांजल खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमधून महिलांचे आक्षेपार्ह फोटो हाती लागले आहेत. त्यांच्या मोबाईल फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ आणि 1497 फोटो आहेत. यात मुलींचे आक्षेपार्ह फोटो आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करण्यात आले. या मोबाईलमध्ये मोलकरणीचे देखील आक्षेपार्ह फोटो आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, यांसह, परराज्यातील मुलींना बोलवून त्यांच्यावर अत्याचार केले गेले, असे तपासात समोर आले आहेत', अशी प्रतिक्रिया रुपाली चाकरणकरांनी दिली. 


सम्बन्धित सामग्री