मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. कोणत्या आमदाराला कोणते खाते जाईल, खातेवाटपावरून नाराजी किंवा कोण घेईल शपथ आणि कोण नाही अश्या बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसात रंगल्या. ह्या सर्व गोष्टींना बगल देऊन ५ डिसेंबर दिवशी देवेंद्र फडणवीस ह्यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
ह्या सर्व घडामोडींना पूर्णविराम मिळताच एक नवीन बातमी समोर येते आहे की भाजपाचे कोलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा कारभार सांभाळणार आहेत. राहुल नार्वेकरांनी निवड ही निश्चित मानली जाते. ते रविवार दुपारी 12 च्या सुमारास आपला अर्ज देतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'जय महाराष्ट्र'ला दिली आहे.
या बाबत प्रतिक्रिया देताना नार्वेकर म्हणले ''मला पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी मी पार पाडेन. पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदा संदर्भात जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल. मला पक्षाने अनेक संधी दिली आहे आणि यापुढेही जी संधी दिली जाईल त्यानुसार काम करेन.'
2024 च्या निवडणुकीत भाजपकडून लढताना नार्वेकर हे 48000 पेक्षा जास्त मतांनी विजय प्राप्त केला. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांचा वादानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपा सोबत सत्ता स्थापन केली तेव्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. विधानसभेत वेळोवेळी होणारे वाद त्यांनी योग्य रीतीने हाथळले व आपली आधीच वर्षाची कारकीर्द संयमी बाळगत पूर्ण केली. 2024 च्या निवडणुकीत भाजपकडून लढताना नार्वेकर हे 48000 पेक्षा जास्त मतांनी विजय प्राप्त केला. दरम्यान, राहुल नार्वेकरच विधानसभा अध्यक्ष बनणार की नाही यावर सर्वांचे लक्षवेधले आहे.