मुंबई: दादरमधील कबुतरखान्याचा वाद चांगलाच पेटला आहे. हायकोर्टानेही मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खायला घालू नये, असे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही काही जैन व्यक्तींकडून कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. पोलिसांनी काही लोकांवरही कारवाई केली आहे, तरी काही लोक कबुतरांना दाणे टाकत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांचा टी-शर्ट सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा: महायुतीत सारं आलबेल ?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक एक्स पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', असा मजकूर लिहिलेला टी-शर्ट घातला होता आणि त्याचा फोटो त्यांनी ट्वीट केला आहे. यानंतर त्यांचा हा टी-शर्ट चर्चेचा विषय बनला आहे. देशपांडे टी-शर्ट सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. देशपांडेनी टी-शर्टवर पोस्ट केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
कबुतरांना धान्य पाणी बंद करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला. तसेच आमच्या निर्णयाचे उल्लंघन होणार नाही. आमच्या निर्णयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या. परंतु तरीही दादरमध्ये एका व्यक्तीला कबुतर प्रेमाला भरते आल्याने त्याने गाडीच्या टपावर कबुतरांना दाणे खायला टाकले. संबंधित चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने पोलिसांनी लगेच कारवाई करून आरोपी महेंद्र सकलेचा याला ताब्यात घेतले.