Wednesday, August 20, 2025 09:32:05 AM

Sanjay Raut: 'शिंदेंच्या मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो'; संजय राऊतांचा घणाघात

गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. मात्र, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे'.

sanjay raut शिंदेंच्या मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: राज्यातील राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत असतात. अशातच, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. मात्र, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे'. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, मंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'शिंदेंच्या मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो'. 

नेमकं प्रकरण काय?

पालघरमधील दुर्वेश याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. मात्र, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे'. यावर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. 

ते म्हणाले की, 'कुणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले. खरंतर, लॉटरी हा प्रतिष्ठीत शब्द आहे. एकेकाळी महाराष्ट्र सरकारदेखील लॉटरी चालवत होतं. पण महाराष्ट्रात आजही बेकायदेशीरपणे मटका सुरू आहे. जरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले, तरीही आकडा लावला जात आहे. तसेच, कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला असाव, त्यांना मटका हा शब्द वापरायचा असेल'.

हेही वाचा: Flight Colour: विमानं प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचीच का असतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

नाईकांच्या वक्तव्यावर राऊत काय म्हणाले?

मंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संऊत राऊत म्हणाले की, 'पूर्वी गणेश नाईक शिवसैनिकच होते. जेव्हा शिवसेनेचा सरकार होता तेव्हा ते मंत्री होते. आम्ही अनेकदा गणेश नाईकांवर टीका केली, पण त्यांनी कधीही मर्यादा ओलांडली नाही, न कधी त्यांनी आमच्यावर टीका केली. त्यांनी हे पथ्य पाळलं आणि तो खूप महत्त्वाचा आहे'. 

'मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो' - राऊत

पुढे संजय राऊत म्हणाले की, 'मटक्याचे आकडे वर-खाली होत असतात. चार-चार लोकं मटक्याचे धंदे चालवतात. एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रात पत्रकारिता केली आहे. त्यामुळे, मला ही गोष्ट माहित आहे. हे आकडे सांभाळता येणार नाही. याचं कारण म्हणजे त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिललीत बसला आहे. ते दिल्लीत येऊन आकडा लावायचा प्रयत्न करतात. पण, सध्या आकडा लागत नाही. खरंतर हे सांभाळणं कठीण असतं, लवकरच त्यांचा आकडा अदृष्य होईल'. 


सम्बन्धित सामग्री