मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन 2 आठवडे होत आले आहे. मात्र, निकालावर आक्षेपार्य वक्तव्य विरोधाकांकडून सुरूच आहे. विरोधी पक्षातले जेष्ठ असो किंवा कनिष्ठ नेते असो प्रत्येकाकडून निवडणुकीच्या निकालावर आणि EVM वर बरेचसे सवाल करण्यात आलेआणि ह्या प्रश्नांचं सत्ताधाऱ्यांकडून वेळोवेळी प्रतिउत्तर देण्यात आलं.
विरोधकांच्या ह्या टीकेवर नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधी नंतर प्रथमच उत्तर दिलं. शिंदे म्हणले 'मी म्हणालो होतो की महाराष्ट्राची जनता विरोधी पक्षांना चारी मुंडी चित करेल. राज्यातल्या जनतेने विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखवली. पुढे उद्धव ठाकरेंना टोला लगावत शिंदे म्हणाले 'जे घरी बसतात त्यांना कोणच मतदान करत नाही.जे फिल्डवर जातात काम करताना त्यांना लोकं मतदान करतात. मतवारीच्या टक्केवारीवर बोलताना शिंदे म्हणाले 'लोकसभेत महाविकास आघाडीला 43.71% मतदान झालं आणि महायुतीला 43.55% तरीही आम्हला १७ जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. मग ह्याला EVM घोटाळा म्हणायचं का ? असा प्रश्न त्यांनी विचारला'.
शरद पवारांविषयी बोलताना ते म्हणाले 'काल पवार साहेबांचा सुद्धा ऐकत होतो. त्यांचा म्हणणं आहे की 79 लाख मतं मिळून शिवसेना 57 जागांवर जिंकून आली, तर काँग्रेसने 80 लाख मते मिळवली तर त्यांच्या 16 जागा निवडून आल्या. कारण काँग्रेस ने 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या तर आम्ही 80 जागा लढवल्या. ईव्हीएम वर आक्षेप घेणे हे अयोग्य आहे. तुम्हाला जागा चांगल्या मिळतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि तुमचा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो हे धोरण बरोबर नाही. लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका हे या मागील अडीच वर्षातील लोकांनी पाहिलेलं कामाचं प्रतिबिंब आहे'. विरोधकांनी हा रडीचा डाव बंद केला पाहिजे असं शिंदेंचं मत आहे.