Thursday, September 04, 2025 07:55:48 AM

विधानसभेसाठी बैठकीत रणनीती

देशाचे गृहमंत्री अमित शाह मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपुरात आल्यानंतर ते कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता संवाद बैठकीत पोहोचले.

विधानसभेसाठी बैठकीत रणनीती 

२४ सप्टेंबर, २०२४, मंगळवार : देशाचे गृहमंत्री अमित शाह मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपुरात आल्यानंतर ते कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता संवाद बैठकीत पोहोचले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीत उपस्थित होते. विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह संवाद साधणार आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतीला मिळालेलं अपयश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी आखली जाणारी रणनीती यावर या बैठकीत विचारमंथन करण्यात आलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री