मुंबईमध्ये मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजले. उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांनी उपोषण सोडले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मराठा समाजावर अन्याय होऊ नये, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही सुरुवातीपासून सकारात्मक होतो. कायदा टिकला पाहिजे याबाबत आम्ही विचार केल्याचेही शिंदे म्हणाले.