Wednesday, September 03, 2025 04:16:51 AM

Sara TendulKar च्या या फोटोमागील सत्य काय आहे? या मुलासोबत ती गोव्याला जात असल्याच्या अफवा

सारा तेंडुलकरच्या एका तरुणासोबतच्या फोटोमुळे ती तिच्या या मित्रासह गोव्याला गेली असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. हा मुलगा कोण आहे? त्याच्यासोबतचे साराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 sara tendulkar च्या या फोटोमागील सत्य काय आहे या मुलासोबत ती गोव्याला जात असल्याच्या अफवा

Sara Tendulkar Photos With Mystery Friend : सारा तेंडुलकरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे गोव्यातील असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोंमध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे. साराच्या अनेक फॅन्सना प्रश्न पडला आहे की, तो मुलगा कोण आहे? सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेल्या साराच्या आणि त्या मुलाच्या फोटोमागील सत्य काय आहे? सारा तेंडुलकर या फोटोंमध्ये एकदम खूश दिसत असून तिच्या त्या मुलासोबतच्या फोटोंवरून असे वाटते की तो तिच्यासाठी कोणीतरी खास आहे. पण कोण?

साराचा भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे तेंडुलकर कुटुंबीय चर्चेत आहे. अर्जुनचा रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याबरोबर साखरपुडा झाल्याची चर्चा होती. पण याबाबत कोणीच अधिकृत माहिती दोन्ही कुटुंबांनी दिलेली नाही. यानंतर सारा तेंडुलकरने पिलाटे्स अकादमी सुरू केली आहे. साराच्या या नव्या अकादमीच्या उद्घाटनाचे फोटोदेखील स्वत: सारा आणि मग सचिन तेंडुलकरने देखील शेअर केले होते. यानंतर गेल्या दोन दिवसांपासून साराचे एका मुलाबरोबर फोटो व्हायरल होत आहेत.

हेही वाचा - VIDEO: Sara Tendulkar आणि Saaniya Chandhok गर्ल्स ट्रिपवर; नणंद-वहिनी अगदी जवळच्या मैत्रिणी

सारासोबत दिसणारा मुलगा कोण आहे?
सर्वप्रथम, सारा तेंडुलकरसोबत असलेला तो मुलगा कोण आहे ते जाणून घेऊ. त्या मुलाचे नाव सिद्धार्थ केरकर असे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर तो एक बिझिनेसमन असल्याचे म्हटले जात आहे. तर, त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून तो एक कलाकार असल्याचे दिसून येते. तो चित्रकार असल्याचं दिलं आहे. तो आपल्या पेंटिग्ससह त्याचे वेगवेगळे लुक्सदेखील शेअर करत असतो. आता, सिद्धार्थ केरकरच्या प्रोफाइलबद्दल जितका गोंधळ आहे तितकाच त्याच्या सारा तेंडुलकरसोबतच्या नात्याबद्दलही गोंधळ आहे.

सारा तेंडुलकर आणि सिद्धार्थ केरकरच्या नात्याचे सत्य
तथापि, सोशल मीडियावर सिद्धार्थ केरकर हा साराचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. कारण, व्हायरल झालेल्या फोटोंमधील दोघांचेही हावभाव अशाच प्रकारचे वाटत आहेत. मात्र, या दोघांमधील नात्याबद्दल कोणताही दावा करता येत नाही. केवळ या फोटोंवरून अंदाज लावले जात आहेत.

सारा आणि सिद्धार्थबद्दल काहीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही
सारा तेंडुलकरचे नाव पूर्वी युवा क्रिकेटपटू शुभमन गिलशी देखील जोडले गेले होते. दोघांचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. पण नंतर त्यांच्या नात्याची बातमी अफवा ठरली. आता अशाच प्रकारचे साराचे फोटो सिद्धार्थ केरकरसोबत दिसत आहेत आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, त्यांच्या नात्याबद्दल सध्या काहीही स्पष्ट नाही.

दरम्यान, सिद्धार्थ आणि सारा तेंडुलकरचे हे फोटो फार जुने आहेत आणि ते पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचं दिसत आहे आणि त्यामुळेच चाहत्यांनी साराचा सिद्धार्थ हा बॉयफ्रेंड असल्याचा उल्लेख केला आहे. पण या दोघांमध्ये नेमकं काय नात आहे, याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
सारा आणि सिद्धार्थचे हे व्हायरल झालेले फोटो 2021-2022 मधील आहेत. लंडन आणि गोव्यामध्ये देखील सिद्धार्थ-सारा त्यांच्या मित्रपरिवारासह फिरताना दिसले होते. तर सिद्धार्थ केरकरचा साराचे आईबाबा म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्याबरोबरचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. त्यामुळे सिद्धार्थ साराच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखतो, हे यावरून म्हटलं जात आहे. तर सिद्धार्थ सारासह आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचे सामने पाहतानादेखील स्टेडियममध्ये दिसला आहे.

हेही वाचा - Rahul Dravid: राजस्थान रॉयल्समध्ये संघर्ष! राहुल द्रविडने 'या' कारणांमुळे सोडले संघाचे प्रशिक्षकपद


सम्बन्धित सामग्री