Wednesday, September 03, 2025 02:42:50 AM

Slowest Train In India : ही आहे भारतातली सर्वात छोटी आणि हळू धावणारी ट्रेन; तरीही पर्यटकांचे आकर्षण

ही ट्रेन भारतात धावायला सुरुवात होऊन 100 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी नेहमीच त्यांचा हा प्रवास संस्मरणीय असल्याचे सांगतात.

slowest train in india  ही आहे भारतातली सर्वात छोटी आणि हळू धावणारी ट्रेन तरीही पर्यटकांचे आकर्षण

Slowest Train Mettupalayam Ooty Nilgiri Passenger : देशातील सर्वात हळू धावणारी ट्रेन कोणती आहे, तुम्हाला माहीत आहे का? विशेष म्हणजे ही ट्रेन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. भारतात ही ट्रेन धावायला सुरू होऊन तब्बल 100 वर्षे होऊन गेली आहेत. या ट्रेनला फक्त 3 ते 4 डबे असतात. संपूर्ण ट्रेनमध्ये बसण्याची व्यवस्था आहे. या ट्रेनचं रिझर्व्हेशन नेहमी फुल्ल असतं. या ट्रेनविषयी लोकांना आकर्षण असण्याचं मुख्य कारण म्हणजे, ही ट्रेन ज्या मार्गावरून चालते, त्याच्या आजूबाजूचा परिसर.. यामुळे लोक या  ट्रेनने प्रवास करण्यास उत्सुक असतात. चला, जाणून घेऊया या ट्रेनबद्दल..

भारतातील सर्वात हळू धावणारी ट्रेन
ही ट्रेन भारतात धावायला सुरुवात होऊन 100 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी नेहमीच त्यांचा हा प्रवास संस्मरणीय असल्याचे सांगतात. या ट्रेनमध्ये 3-4 डबे असतात. संपूर्ण ट्रेनमध्ये बसण्याची व्यवस्था आहे. ती चालवण्याचे संपूर्ण श्रेय ब्रिटिशांना जाते. तुम्हाला माहीत आहे का, मेट्टुपलयम-ऊटी निलगिरी पॅसेंजर ट्रेनला सर्वात हळू धावणारी ट्रेन म्हटले जाते. 

कधीकधी या ही ट्रेन ढगातून धावत असते. ही ट्रेन नेहमीच भरलेली असते. यासाठी या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी लोकांना आगाऊ बुकिंग करावे लागते. ही एक अतिशय सुंदर ट्रेन आहे. तिचे डबे निळ्या रंगाचे आहेत आणि ती नेहमीच चमकत असल्यासारखे दिसते. देशातील सर्वात हळू असलेली ही ट्रेन मेट्टुपलयम-ऊटी निलगिरी पॅसेंजर ट्रेन ऊटी आणि कुन्नूरला भेट देणाऱ्या पर्यटकांची आवडती ट्रेन आहे.

हेही वाचा - Vaishno Devi Yatra: भाविकांना मोठा दिलासा; वैष्णोदेवी यात्रेसाठी बुकिंग रद्द करणाऱ्यांना परत मिळणार पूर्ण पैसे

मेट्टुपलयम ते ऊटी अशी ट्रेन
ही ट्रेन तामिळनाडूमधील मेट्टुपलयम ते ऊटी अशी धावते, या प्रवासात ट्रेन 46 किमी प्रवास करते. या ट्रेनला सुमारे 5 तास लागतात. तिचा सरासरी वेग सुमारे 10 ते 12 किलोमीटर प्रतितास आहे. म्हणजे, या ट्रेनचा वेग एखाद्या सायकलएवढा आहे. तुम्हाला माहीत आहे का, या ट्रेनचा वेग इतका कमी का आहे? ही ट्रेन पर्वत रांगावर धावते आणि रँक अँड पिनियन सिस्टम (दात असलेली रेल आणि गियर सिस्टम) वापरते जेणेकरून, ती चढ-उतारावर व्यवस्थित चालू शकेल. तीव्र वळणांमुळे वेग मंद असतो.
ट्रॅकवर अनेक तीव्र वळणे आणि उतार असतात, त्यामुळे वेग खूप मर्यादित ठेवावा लागतो. ही ट्रेन युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे, ती स्वतःही पर्यटकांचे आकर्षणदेखील आहे. ही ट्रेन ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरून खूप सुंदर दृश्ये दिसतात, त्यामुळे या ट्रेनमध्ये बसलेल्या कोणालाही तिच्या मंद गतीचा कंटाळा येत नाही. उलट, या वेगामुळे वळणांवर निसर्गाचे दृश्य पूर्णतः अनुभवता येते. जरी भारतात मंद गतीने चालणाऱ्या अनेक प्रवासी गाड्या आहेत, ज्यांचा वेग 25 ते 30 किलोमीटर प्रतितास आहे. परंतु, देशातील सर्वात मंद गती असलेल्या ट्रेनचा विक्रम निलगिरी माउंटन पॅसेंजरकडे जातो.

या रेल्वेचा ट्रॅक बांधणे हे एक अभियांत्रिकी आव्हान होते
या रेल्वेचा ट्रॅक बांधणे हे एक अभियांत्रिकी आव्हान होते. या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव 1854 मध्ये मांडण्यात आला होता. परंतु, कठीण रस्ते, पर्वत आणि उंचीमुळे बांधकामात अनेक अडथळे आले. ज्यामुळे या ट्रेनचे बांधकाम 1891 मध्ये सुरू होऊ शकले. ते 1908 मध्ये ते पूर्ण झाले. उंची आणि तीव्र उतारामुळे, पारंपरिक वाहन-ट्रॅक प्रणाली त्यासाठी पुरेशी नव्हती. म्हणूनच, नीलगिरी माउंटन रेल्वेने आव्हानाला तोंड देण्यासाठी रॅक आणि पिनियन प्रणाली स्वीकारली.

ही ट्रेन 208 वळणांवरून, 250 हून अधिक पूलांवरून जाते
या रेल्वे मार्गावर 208 वळणे आहेत. शिवाय,16 बोगदे आणि 250 हून अधिक पूल आहेत. प्रत्येक वळणावर, बोगद्यात आणि पुलामुळे ट्रेनचा वेग मर्यादित होतो. अर्थात, नवीन तंत्रज्ञानामुळे ट्रेनचा वेग वाढवता येतो. परंतु, युनेस्कोचा वारसा असल्याने, ती जास्त वेगाने चालवली जात नाही.

ही ट्रेन ऊटीहून सुरू होते
ऊटी हे भारतातील सर्वात जुन्या हिल स्टेशनपैकी एक आहे, उंचावर वसलेले हे शहर ब्रिटिश राजवटीच्या उन्हाळी सुट्टीचे ठिकाण होते. जेव्हा ब्रिटिशांना मैदानी प्रदेशातील कडक उन्हाळ्यापासून स्वतःला वाचवण्याची आवश्यकता असे, तेव्हा ते येथे येत असत. आज हे एक गजबजलेलं लहान शहर आहे. जेव्हा ही ट्रेन ऊटीहून धावते, तेव्हा वाटेत लव्हडेल, वेलिंग्टन, अॅडरली, कुन्नूर आणि रनीमेड या स्टेशनवरून पुढे जाते. या मार्गांवर प्रवाशांना नैसर्गिक दृश्ये, बर्फाळ दऱ्या, चहाचे बागा पाहायला मिळतात.

हेही वाचा - Indian Travel Advisory : जर तुम्ही परदेशात जात असाल तर सावध रहा! या 7 देशांना भेट देणे ठरू शकते धोकादायक

ही ट्रेन एका दिवसात अनेक फेऱ्या मारते
ही ट्रेन उटी ते मेट्टुपलयम पर्यंत दिवसातून अनेक वेळा धावते, सुमारे 120 वर्षांपासून धावणाऱ्या या ट्रेन आणि रेल्वे मार्गाला युनेस्को हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. निलगिरी माउंटन रेल्वेची स्थापना 1899 मध्ये झाली. ती 1908 मध्ये पूर्णपणे कार्यरत झाली. ती डोंगराळ भागात वाहतुकीसाठी ब्रिटिश काळात बांधण्यात आली. या ट्रेनच्या मार्गावरील सर्व स्थानके निळ्या रंगाची आहेत. ट्रेनदेखील निळ्या रंगाची आहे. कारण, ती निलगिरी पर्वतातून धावते.


सम्बन्धित सामग्री