मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला यश आले आहे. दरम्याने जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जीआर स्वीकारला आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आहे. उपोषण सोडताना त्यांनी लिंबू पाण्याचे सेवन केले. त्याचप्रमाणे उपोषण सोडताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानदेखील दिसून आले.