Thursday, August 21, 2025 02:06:20 AM

मराठीच्या भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर

मुंबईमध्ये वरळीतील एनएससीआय डोम येथे विजयी मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार घुमला.

मराठीच्या भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर

मुंबई: मुंबईमध्ये वरळीतील एनएससीआय डोम येथे विजयी मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार घुमला. मराठीच्या भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी... आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्यातला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. तर मराठीकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहू नका. आम्ही शांत आहोत याचा अर्थ... मराठी भाषेशी कुठलीही तडजोड नाही असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अनाजीपंतांनी आमच्यातला अंतरपाट दूर केला. 'म' महानगरपालिकेचा नव्हे महाराष्ट्राचाही आहे. आम्ही एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी.. राज ठाकरेंचं कर्तृत्व पाहिलंय, तो सन्माननीय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. न्याय मागणं गुंडगिरी असेल तर आम्ही गुंडगिरी करू. मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली. दिल्लीतल्या मालकांचे बूट चाटण्यासाठी माझं सरकार पाडल्याचेही त्यांनी सांगितले. मराठीवर एकवटलो, जाती-जातीत भांडायचा नतद्रष्टपणा करायचा नाही. मोदींनी इकडे घाण केली, तिकडे स्टार ऑफ घाणा झाले. पुष्पा झुकेगा नहीं म्हणायचा, हे गद्दार उठेगा नही म्हणतात असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : Uddhav Thackeray: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी...

काय म्हणाले राज ठाकरे?
हिंदी निर्णयाबाबत ऐकून घेईन, ऐकणार नाही. बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांनी केलं असे राज ठाकरे यांनी म्हटले. तर कुणाची माय व्यालीय? मुंबईत, महाराष्ट्राला हात घालूनच बघा. मराठीविरूद्ध नाटकं करणाऱ्यांच्या कानाखाली लावा. तुमची सत्ता विधानभवनात, आमची सत्ता रस्त्यावर असल्याचे राज यांनी सांगितले. मोर्चाच्या चर्चेनं माघार घेतली. शांत आहोत म्हणजे XX नाही. अमित शाहांना इंग्रजी कुठं येतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र पेटल्यावर काय होतं, हे सत्ताधाऱ्यांना कळलं असेल. खबरदार, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघाल तर! अशा शब्दात राज यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. 

 


सम्बन्धित सामग्री