Monday, September 01, 2025 05:08:50 AM

शिवसेनेच्या कोणत्या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

नागपूरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.

शिवसेनेच्या कोणत्या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई : नागपूरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या 20, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेना पक्षाच्या गुलाबराव पाटील यांनी सर्वप्रथम मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर दादा भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

2022 च्या एकनाश शिंदे सरकारमध्ये उद्योगमंत्री म्हणून काम पाहिलेल्या उदय सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शंभूराज देसाई यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम केले आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी शपथ घेतली आहे. 2009, 2024, 2019 आणि 2024 या वर्षी आमदार म्हणून निवडून आलेले प्रताप सरनाईक यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये महाड विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून काम केलेले भरत गोगावले यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

 

शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी

 

  1. गुलाबराव पाटील
  2. दादा भुसे
  3. उदय सामंत
  4. शंभूराज देसाई
  5. संजय शिरसाट
  6. प्रताप सरनाईक
  7. भरत गोगावले
  8. प्रकाश आबिटकर
  9. योगेश कदम
  10. आशिष जयस्वाल
  11. संजय राठोड

सम्बन्धित सामग्री