मेष: आज तुमचा आत्मविश्वास आणि उर्जा असेल. कोणीतरी तुमच्याकडून उसने घेतलेले परत मागायला येऊ शकतो. जर तुम्ही त्याला पैसे दिले, तर तुमची आर्थिक परिस्थिती थोडी कठीण होऊ शकते. त्यामुळे, आज उधार देणे किंवा घेणे टाळा.
वृषभ: शक्य झाल्यास आज तुम्ही जास्त आशावादी राहण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अडचणींवर सहजपणे मात करू शकाल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीशी संबंधित कामावर खर्च करावा लागू शकतो. सायंकाळी मित्रांसोबत बाहेर गेलात तर मन प्रसन्न होईल आणि चांगला अनुभव येईल.
मिथुन: वयस्कर लोकांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. संशयास्पद योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. घरच्यांना दुखवू नका, याउलट त्यांना समजून घ्या. आज प्रेमसंबंधात तुम्हाला समाधान आणि आनंद मिळेल. मोकळ्या वेळेत राहिलेली कामे पूर्ण करा.
कर्क: ध्यानधारणा आणि योग केल्याने तुम्हाला मन:शांतीसह व्यावहारिक फायदेही मिळू शकतात. पैशाचे व्यवहार करताना नीट लक्ष द्या, अन्यथा अडचणीत याल. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल.
सिंह: तुमच्या आकर्षक आणि मनमोहक स्वभावामुळे तुम्ही इतरांचे लक्ष स्वत: कडे वेधून घ्याल. घरातून बाहेर पडताना आनंदी असाल, मात्र, तुमची आवडती वस्तू गहाळ झाल्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा.
कन्या: आज तुम्हाला आराम करण्याची गरज आहे. संततीची काळजी घ्या, अन्यथा तब्बेत बिघडू शकते. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. एकमेकांचे दृष्टिकोन समजून घ्या आणि वैयक्तिक प्रश्न सोडवा.
तूळ: जर आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, जपून पैसे खर्च करा, अन्यथा धन हानी होऊ शकते. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. जवळच्या व्यक्तीशी मतभेद झाल्याने तुमचा दिवस तणावपूर्ण जाईल.
वृश्चिक: आज तुम्ही एका प्रभावशाली व्यक्तीला भेटू शकता. कोणत्याही व्यक्तीला पैसे उधार देणे टाळा. तुमचा जोडीदार दिवसभर तुमची आठवण काढेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल.
धनु: सर्व अडचणी आणि समस्यांवर तुम्ही हसत हसत मात कराल. लांब राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने आजचा दिवस आनंदाचा ठरेल. वेळेत कामे पूर्ण केल्याने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील लोकांना आनंद मिळेल.
मकर: खेळांमध्ये सहभागी झाल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहाल. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे, यादरम्यान, कमाईच्या काही संधी मिळतील. आज तुमचा मूड छान राहील आणि तुम्ही आनंदी वाटाल.
कुंभ: आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल आणि अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याद दिवसांपासून आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलण्याची इच्छा असेल, तर आज तुमची ती इच्छा पूर्ण होईल.
मीन: तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांनी पाठिंबा दिल्याने तुम्हाला अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता आहे. मात्र, श्रम करणे चालू ठेवा. सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आज संध्याकाळी काहीतरी खास प्लॅन करा.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)