Shani Dev Transit 2025: ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला ‘कर्मफळदाता’ म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या केलेल्या चांगल्या वा वाईट कर्मानुसार फळ देणारा हा ग्रह मानला जातो. शनी हा सर्वात मंद गतीने फिरणारा ग्रह असल्यामुळे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला साधारण अडीच वर्ष लागतात. 29 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजून 01 मिनिटांनी शनीने मीन राशीत प्रवेश केला आहे. आता तो 3 जून 2027 पर्यंत या राशीत राहणार आहे. या काळात अनेक राशींवर वेगवेगळे परिणाम दिसतील. मात्र पुढील 21 महिने विशेषतः तीन राशींवर शनीदेवाची खास कृपा राहणार आहे कर्क, वृश्चिक आणि मकर.
कर्क राशीवर शनीची कृपा
कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ सकारात्मक उर्जेने भरलेला ठरेल. आर्थिकदृष्ट्या नवे दरवाजे उघडतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता प्रबळ आहे. पूर्वी अडकलेले पैसे हातात येतील, तर नोकरीत पदोन्नतीसाठी शुभ संकेत मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवनात सौहार्द वाढेल आणि मानसिक तणाव कमी होईल. समाजात मान-सन्मान वाढण्याचा काळ असल्यामुळे कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील.
हेही वाचा: Pune Ganesh Visarjan 2025: पुण्यात गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे फोटो-व्हिडिओ काढण्यास मनाई; प्रशासनाचा कडक आदेश
वृश्चिक राशीसाठी अनुकूल काळ
शनीचा हा गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. आपल्या मनातल्या अनेक इच्छा या काळात पूर्ण होतील. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात मन रमेल. कार्यालयीन क्षेत्रात तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल, ज्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. भाग्याची साथ असल्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळेल. कुटुंबासोबत सहली, प्रवास आणि आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. याशिवाय, जुने अडथळे दूर होऊन जीवनात नवा उत्साह निर्माण होईल.
मकर राशीला लाभ होणार
मकर राशीच्या व्यक्तींनाही शनीदेवाची कृपा लाभणार आहे. करिअरमध्ये नवी दारे उघडतील. परदेशी प्रवास किंवा दूरचे कामकाज घडून येऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील, कर्ज फेडण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आणि व्यावसायिक प्रगती या काळात मिळेल. आर्थिक पातळीवर भरपूर स्थैर्य येईल, ज्यामुळे दीर्घकालीन योजना पूर्ण होऊ शकतील.
हेही वाचा: Grahan Precautions: 7 सप्टेंबरला चंद्रग्रहण, गरोदर महिलांनी काय करु नये?, जाणून घ्या..
शनीचा मीन राशीत झालेला हा गोचर अनेकांसाठी वेगवेगळ्या परिणामांसह आला असला, तरी कर्क, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ खरोखरच सोन्याची संधी घेऊन येणार आहे. आर्थिक उन्नती, करिअरमध्ये यश, कुटुंबात आनंद आणि सामाजिक प्रतिष्ठा या तिन्ही राशींवर पुढील 21 महिन्यांत शनीदेवाची विशेष कृपा राहणार आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)