मेष: लहान मुलांसोबत खेळल्याने तुमचं मन प्रसन्न होईल. एखादा जुना मित्र तुम्हाला व्यवसायात नफा मिळवण्यासाठी चांगला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अमलात आणला, तर तुम्हाला नक्कीच धनलाभ होईल. स्वत:चं कौतुक करण्यात वेळ वाया घालवू नका.
वृषभ: रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही एखाद्या अडचणीत येऊ शकता. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला भरघोस नफा होईल. आज तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा नातेवाईकांच्या घरी जाण्याचा विचार करू शकता.
मिथुन: कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून येणाऱ्या दबावामुळे आणि घरी होणाऱ्या वादांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल, त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित होणार नाही. खर्च वाढल्याने तुमचे मन अस्वस्थ होईल. रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर परिस्थिती आणखी बिघडेल. गुप्त व्यवहारांमुळे तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते.
कर्क: शारिरीक क्षमता टिकवण्यासाठी तुम्ही खेळ किंवा व्यायामासाठी वेळ काढा. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे टाळा. नातेवाईक आणि मित्रांकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्यास घरात तणाव होऊ शकतो.
सिंह: पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, नाहीतर तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाकडे लक्ष द्या. तुमची परदेशातील जमीन चांगल्या किमतीत विकली जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नफा मिळेल.
कन्या: कामाच्या ठिकाणी आणि घरी होणाऱ्या वादांमुळे तुम्ही थोडे चिडचिडे व्हाल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता, ही योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. घरात नवीन सदस्याच्या आगमनाने आनंदाचे वातावरण असेल. गरज नसताना बोलू नका. कारण अनावश्यक बोलल्याने तुमची चिंता वाढू शकते.
तूळ: आज तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुम्ही खेळकर मूडमध्ये असाल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. आज स्वत:ला समजून घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही लोकांच्या गर्दीत हरवलेले आहात, तर तुम्ही स्वत:साठी थोडा वेळ काढा आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्या.
वृश्चिक: आज केलेले दानधर्म तुम्हाला मन:शांती आणि समाधान देईल. तुमच्या ओळखीच्या लोकांमुळे तुम्हाला पैसे कमवण्याचा एक नवीन मार्ग सापडेल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने काम यशस्वी होईल.
धनु: काही गोष्टी टाळता येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ होऊ शकता. पण घाबरून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज जुने मित्र, ओळखी आणि नाती तुमच्या मदतीला येतील,
मकर: आज तुमचे व्यक्तिमत्व इतरांना खूप आकर्षक वाटेल, जसे सुगंधित अत्तर सर्वांना आकर्षित करते. आज तुमच्या घरी बिन बुलाया मेहमान येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो.
कुंभ: आज तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल. त्यामुळे, सावधगिरी बाळगा आणि त्रास होणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. कोणालाही सहजपणे आर्थिक मदत करू नका, ते विश्वसनीय आहेत का ते तपासा. अन्यथा, तुमचे नुकसान होऊ शकते.
मीन: तुमची इच्छाशक्ती कमी असल्याने आज तुम्ही भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकता. आज केलेली गुंतवणूक तुमच्या भविष्यातील संपत्ती आणि सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरेल. एखाद्या जुन्या मित्राचा तुम्हाला फोन आल्याने तुमची संध्याकाळ अविस्मरणीय होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)