Thursday, August 21, 2025 12:04:04 AM

Today's Horoscope: आजचा दिवस कोणासाठी ‘लकी’? जाणून घ्या 29 जुलैचं संपूर्ण राशीभविष्य

चंद्र सिंह राशीत असून आजचा दिवस काही राशींना यश, आत्मविश्वास व सौख्य देणारा आहे. काही राशींनी आरोग्याकडे व खर्चाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

todays horoscope आजचा दिवस कोणासाठी ‘लकी’ जाणून घ्या 29 जुलैचं संपूर्ण राशीभविष्य

Today's Horoscope: श्रावण महिन्याचा पवित्र कालावधी सुरू असून, आजचा मंगळवार आहे. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे काही राशींना सकारात्मक उर्जा लाभणार आहे, तर काहींसाठी संयम ठेवण्याचा दिवस आहे. चंद्र आज सिंह राशीत भ्रमण करत आहे, त्यामुळे आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण यांचा प्रभाव दिसून येईल. चला तर मग पाहूया, आज तुमच्या राशीचं भविष्य काय सांगतंय!

मेष (Aries): आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. नवे संधीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना यश मिळू शकते. कार्यालयात वरिष्ठांची मदत होईल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. आर्थिक बाजू मजबूत होईल. सायंकाळी मित्रांसोबत वेळ घालवाल.
शुभ रंग: लाल
शुभ अंक: 3

वृषभ (Taurus): नवीन करार किंवा व्यवसायासंबंधी चर्चा करत असाल तर यश मिळू शकते. कौटुंबिक सौख्य लाभेल. आज निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ घ्या. आरोग्य उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग: पांढरा
शुभ अंक: 6

मिथुन (Gemini): मन थोडं अस्वस्थ राहू शकतं. सामाजिक क्षेत्रात वाद संभवतात, म्हणून संयमाने वागा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. प्रवास टाळा. प्रियजनांसोबत संवाद वाढवा.
शुभ रंग: हिरवा
शुभ अंक: 5

हेही वाचा: Mars Transit: अखेर 'या' राशींची मंगळ-केतू युतीतून सुटका, आता होणार सुख-समृद्धीचा वर्षाव; जाणून घ्या

कर्क (Cancer): आर्थिक बाबतीत चांगला दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. मानसिक स्थैर्य लाभेल. नविन नोकरीच्या संधी येतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ रंग: निळा
शुभ अंक: 2

सिंह (Leo):स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. नवे संकल्प राबवण्यासाठी योग्य वेळ. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. मित्रांचा पाठिंबा लाभेल.
शुभ रंग: सोनेरी
शुभ अंक: 1

कन्या (Virgo): कामाच्या ठिकाणी सतर्क राहा. थोडी मानसिक तणावाची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रमंडळींनी आज मदतीचा हात दिल्यास त्यांना कृतज्ञ राहा.
शुभ रंग: राखाडी
शुभ अंक: 7

तुळ (Libra): आज तुम्हाला नवी ओळख किंवा सहकार्याची संधी मिळेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला दिवस. प्रेमात प्रगती होईल. कलाकारांसाठी दिवस अनुकूल. आत्मविश्वासात वाढ होईल.
शुभ रंग: गुलाबी
शुभ अंक: 9

हेही वाचा: अस्वच्छता की दैवी इशारा? जेवणात केस सापडण्यामागचं आध्यात्मिक सत्य; जाणून घ्या

वृश्चिक (Scorpio): महत्त्वाचे निर्णय आज टाळा. इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. घरात थोडा वाद निर्माण होऊ शकतो. शांत राहा. खर्च वाढण्याची शक्यता आहे.
शुभ रंग: लालभुरा
शुभ अंक: 8

धनु (Sagittarius): विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल. करिअरच्या दृष्टीने सकारात्मक वाटचाल. मानसिक आनंद लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नविन जबाबदारी स्विकारावी लागेल.
शुभ रंग: केशरी
शुभ अंक: 3

मकर (Capricorn): दैनंदिन कामात यश मिळेल. सहकारी मदतीला येतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. खर्चाची काळजी घ्या. आरोग्य मध्यम. प्रवास शक्यतो टाळा.
शुभ रंग: काळा
शुभ अंक: 4

कुंभ (Aquarius): नवीन योजना राबवण्यासाठी चांगला दिवस. व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदेशीर. जुनी कामं पूर्ण होतील. संबंध सुधारतील. शरीरात उत्साह राहील. संध्याकाळी मानसिक समाधान मिळेल.
शुभ रंग: जांभळा
शुभ अंक: 7

मीन (Pisces): भावनांवर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती मध्यम असेल. मित्रांकडून अपेक्षित मदत मिळेल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल.
शुभ रंग: आकाशी
शुभ अंक: 6

आजचा दिवस अनेक राशींसाठी संमिश्र आहे. काहींसाठी नव्या संधींचा, आत्मविश्वासाचा आणि प्रगतीचा काळ आहे, तर काहींसाठी संयम, आरोग्याची काळजी आणि शांत राहण्याची गरज आहे. श्रावण महिन्याचा हा पवित्र कालावधी, ज्योतिषशास्त्रानुसार आत्मविकासासाठी सर्वोत्तम आहे. त्यामुळे शुभ विचार, चांगल्या सवयी आणि सात्त्विक आचरण यांची साथ ठेवत जीवनाकडे सकारात्मकतेने पाहा.

(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.) 


सम्बन्धित सामग्री